देवा-धर्माला विरोध नाही


का हो, तुम्ही देवाच्या धर्माच्या का विरुद्ध आहात? अंधश्रद्धांच्या नावाखाली तुम्ही देवाविषयीची श्रद्धा व आमचा धर्मच उखडवायला निघाला आहात का?तुम्ही देवाविषयी श्रध्दा व आमचा ध्रर्मच उखडवायला निघाला आहात का? तुम्ही समाजातील देव, धर्म घालवून सारी अनीती माजवणार आहात का?'

असे प्रश्न गेल्या २९ वर्षांपासून सातत्याने आम्हाला विचारले जात आहेत. कधी केवळ कुतूहलाने तर अनेकदा गर्भित धमकीसह, तर कधी व्यक्तिगत पातळीवर असे प्रश्न विचारले जातात, तर कधी धार्मिक संघटनांमार्फत विचारले जातात. प्रश्न कसाही विचारला जावो, अंधश्रद्धा निर्मूलन चळ्वळीशी या प्रश्नाचे एक अतुट नातं निर्माण झालंय एवढं मात्र खरं. याच एका पातळीवरुन हा प्रश्न विचारला जातोय असं नाही.

''का हो, तुम्ही तर देव-धर्म यांना मुळीच हात लावत नाही. देवावर व धर्मावर कठोर हल्ला केल्याशिवाय समाजातील अंध्दश्रध्दा कशा दूर होणार? मुळ सोडून काय फांद्या झोडपत बसला आहात?'' या पध्दतीचे प्रश्न तर अधिकच कडवटपणे विचारले जातात. प्रामुख्याने पुरोगामी चळ्वळीत वावणारे लोक तर अक्षरशः आम्हाला आरोपीच्या पिंज-यात उभे करुनच अशा प्रश्नांचा भडीमार करतात. एवढंच नव्हे तर तुम्ही कसे बेअक्कल आहात, घाबरट आहात, तडजोडवादी आहात असं सांगण्याचाही यामागे अट्टाहास असतो.

खरं म्हणजे गेल्या २९ वर्षात या दोन्ही प्रकारच्या प्रश्नांना आम्ही समर्थपणे उत्तरे देत आलोय. एवढंच नव्हे तर महाराष्टाल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या लोणावळा येथील एका शिबिरात "देव व धर्म विषयक तब्बल अडीच दिवस प्रदीर्घ चर्चा झाली, वादावादी झाली आणि नंतर एकमतानं एक निर्णय घेण्यात आला.

"अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन चळ्वळ ही देवाच्या व धर्माच्या विरुध्द नाही. लोक ज्याला उघड अंधश्रध्दा समजतात त्या बाबा, बुवाबाजी, चमत्कार, नशीब, फलज्योतिष, भूत, भानामती, जादूटोणा, मंञतंत्र, अंगात येणं, आरोग्याविषयक गैरसमजूती याविरुध्द जनप्रबोधन करणं आणि देवाच्या, धर्माच्या नावावर सर्वसामान्य जनतेला लुबाडणार्‍या मधल्या दलालांविरुध्द उभं ठाकून त्यांचा भंडाफोड करणं हे आपलं प्रमुख उद्दिष्ट ही चळवळ मानते".

समाजामध्ये वैज्ञानिक द्रूष्टीकोन रुजवण्यास कटिबध्द असणाऱ्या चळवळीत ज्यांना अंधश्रध्दा दूर व्हाव्यात असं वाटतं, त्या सगळ्यांना अगदी देव व धर्म मानणार्‍यांना सुध्दा प्रवेश आहे. अगदी देव व धर्म न मानण्यांच्या बरोबरीच्या प्रतिष्टेनं त्यांचंही स्वागत आहे. देव व धर्म मानणार्‍यांना या चळवळीत समान प्रतिष्ठा आहे. याचा अर्थ या चळवळीत समान प्रतिष्ठा आहे. याचा अर्थ या चळ ळीच्या मंचावरुन देव आणि धर्माचा प्रसार करण्यांच स्वातंञ्य आहे,असा कुणी घेऊ नये.अर्थात देव व ध्रर्म या विषयावर संघटनांतर्गत व बाह्य व्यासपीठावर या विषयावर आपापली मते मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार राहील.देव व ध्रर्म न मानणार्‍यांनाही राहील.देव व धर्म न मानणार्‍यांना आपली मते जेवढया ताकदीने मांढण्याची मुभा राहील.तेवढीच संधी देव व धर्म मानणार्‍यांनाही राहील.पण,ही मते व्यक्तिगत समजली जातील.ती संघटनेची अधिकृत मते मानली जाणार नाहीत,असा एक्मुखी निर्णय संघटनेनं घेतला आहे.गेल्या २९ वर्षापासुन याच धोरणांन चळवळींच काम सुरु आहे. यात काही नवं नसलं तरी अधिकृतपणे ही संघटनेची भूमिका आहे. कारण या चळ्वळीत अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते देव न मानणारे आहेत.ध्रर्माची उघडपणे चिकित्सा करणारे आहेत.त्या सर्वानीं ही भूमिका स्वीकारणे म्हणजे आजवर मांडत आलेल्या आपल्याच म्हणण्याला मूरड घालणे होय,असं वाटणं स्वाभाविकही होत.तरी पण त्यांनी अंधश्रध्दा निर्मुलन चळ्वळ हे एक व्यासपीठ आहे ,हे लक्षात घेऊन ही भूमिका स्वीकारली आहे.

येथे वारंवार 'भूमिका' हा शब्द वापरत आहे.कारण वरील निर्णय हा स्ट्रॅटेजी अथवा सोईजी तडजोड नाही तर एक स्वतंञ विचार आहे ,हा मुद्दा व्यवस्थितरित्या समजावून घेतला पाहीजे.

"देव व धर्म विषयक ही केवळ स्ट्रॅटेजी असती तर यांचा अर्थ असा झाला असता की ,मुळात संघटना देव व धर्माच्या विरुध्द आहे ,या समाजात देव व धर्माच्या विरुध्द आहे ,या समाजात देव व धर्म राहता कामा नये असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं .पण सध्या असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं.पण सध्या असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं पण सध्या�असं सांगण्यात धोका आहे.म्हणून आम्ही हा मुद्दा मांडत नाही, त्याविषयी मूग गिळून राह्तो.पुढे सवड मिळ्ताच आम्ही हा मुद्दा मांडत नाही, त्याविषयी मूग गिळून राह्तो.पुढे सवड मिळताच आम्ही धर्म व देव यावर कडाडून ह्ल्ला करु"असं मत आमचं नाही.म्हणूनच ही स्ट्रॅटेजी नाही.केवळ चळवळ वाढीसाठी स्वीकारलेली सौयीची तडजोडी नाही.मग अशी भूमिका संघटनेने का स्वीकारली?आमचं मुख्य उद्दिष्ट समाजातल्या अंध्यश्रध्दा दूर करावयाच्या तो धर्म मानणारा आहे,एवढच नव्हे तर हे दोन्ही मुद्दे त्याच्या द्ष्टीने अगदी प्रामाप्रिय आहेत.ते सर्वसामान्य माणसाच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनले आहेत.

देव व धर्म मानणार्‍या व अगदी घट्ट कवटाळणा-या समाजाच्या अंधश्रध्दा दूर करावयाच्या असतील तर आपल्या देव व धर्म विषयक कल्पनांना धक्का लागणार नाही,असा विश्वास त्याला वाटला तरच तो अंधश्रध्दा म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी आपण आधी अंधश्रध्दा व देव,धर्माचं नातं तपासून पाहू.

अनेक पुरोगामी विचार करणा-यांना -यांच्या अभ्यासाआभ्यांसाआधारे प्रामाणिकपणे वाटतं की देव व धर्म ही कल्पनाच अंधश्रध्दा टिकून आहेत.देव व धर्म ही कल्पनाच अंधश्रध्दाचं खरं मूळ आहे.हे खरं आहे का?

देव आहे की नाही या वादात न पडता,देव या कल्पनेचा निर्मिती कशी झाली ते आपण पाहुया.
मानववंशशास्त्राचा अभ्यास आपणांस सांगतो की,निसर्गाविषयीच्या अञानातून माणसांन देवाची कल्पना निर्माण केलं की नाही याविषयी वाद होऊ शकेल.पण माणसाने देव निर्माण केला हे एक निर्विवाद सत्य आहे.

देवाची कल्पना केवळ अञानापोटी निर्माण झाली नाही,तर ती एक मूलभूत अशी मानसिक गरजही होती.माणुस जन्मताच आईच्या नाळेपासून तोडला जातो.त्याला एकटं असुरक्षित वाटायला लागतं.म्हणून तो प्रथम आईला व नंतर मानवी समाजाच्या प्रगल्भ अवस्थेत सर्वशक्तीमान देवाशी वा ईश्वराशी स्वतःला जोडून घेतो.स्वतःची नाळ कधीही न तुटणा-या चिरंतन,सर्वव्यापी अशा ईश्वराशी त्यानं जोडली.म्हणूनच ईश्वराची कल्पना सर्वदूर व सर्वच समाजात प्रस्थापित झाली.
आजच्या काळात इतिहासात कधीही नव्ह्ती एवढी अधिक सुरक्षित समाजव्यवस्था निर्माण झाली आहे,त्यामुळे ही नाळ आज समाजातल्या माणसांशी जोडून घेणं सहज शक्य आहे.देव या कल्पनेशिवायही नीतीमान व सुसंस्कृत समाज राहू शकतो,हे आज काळानं सिध्द केलं आहे.मग अशा अवस्थेत देवाला का विरोध करायचा नाही?त्यासाठी माणसांच व्यक्तिमत्व कसं घडतं,मेंदूची जडणघडण कशी बनते या अभ्यासाकडे आपणांस वळावं लागेल.

माणसानं मेंदूच्या रचनेवरुन आजचा संगणक बनवला असला तरी आपला मेंदू समजून घेण्यासाठी आपल्याला संगणकाच्या कार्यप्रणालीचं उदाहरण घावं लागेल.
को-या संगणकावर तुम्ही जी जी माहिती भराल,ती ती माहिती कायमची कोरली जाते.याच माहितीच्या आधारे संगणक पुढील प्रश्नांची उत्तरे देत असतो.ही माहिती भरतेवेळी ती खरी वा थोटी जाणून घेऊन संगणक ती भरुन घेत नाही.अगदी तद्दन खोटी माहितीसुध्दा संगणक तेवढयात निर्विकारपणे स्वीकारत असतो.ज्योतिषीसंगणक हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे.तसेच माणसाच्या मेंदुचे आहे.पहिल्या सहा वर्षांपर्यत परिसरातून,आईबापाच्या संस्कारातून,सवंगडयातून जी जी माहिती मिळते ती ती माहिती माणसाच्या मेंदूचा फीडबँक ठरते यातूनच माणसांचा मेंदू घडतो आणि मग पुढील आयुष्याच्या सा-या प्रश्नांची उत्तरं त्या व्यक्तीच्या या मेंदूच्या प्राथमिक घडणीनुसार मिळतात.संगणकाचा हा जूना फीडबँक बदलता येतो,तशाच माणसालाही प्रयत्नपूर्वक प्राणी आहे,स्वभावाला औषध नाही,हे वाक्य तद्दन खोटं आहे.माणसाला,स्वभाव,सवयी ब-याच गोष्टी बदलवता येतात.

पण यात एक मूलभूत फरक आहे.माणसाचा हा संपूर्ण भाग त्याच्या अंतर्मनात(जागृत मन आणि अंतर्मन या मेंदूचे कार्य नीट समजावून घेण्यासाठी आपण वापरलेल्या कल्पना आहेत)साठवलेला असतो.

अंतर्मनाचे एक स्वतंत्र अस विश्व आहे.माणसाचं संपूर्ण अस्तित्व या अंतर्मनावर अवलंबून आहे,या अंतर्मनाची एक स्वतंत्र सरंक्षण यंत्रणा आहे.ज्या ज्या वेळी आपल्यावर आघात होतो,तसा आभास होतो,त्या त्या वेळी जागृत मनाला बाजूला सारुन अंतर्मन निर्णय घेते व तो अमलात आणते.धोका दिसल्याबरोबर बाजूला होणं अथवा पळ काढणं हे त्यांच उत्कृष्ट उदाहरण होय.
आपल्या समाजात सर्वसामान्य माणूस ज्या वातावरणात वाढतो,त्या वातावरणामुळे लहानपणाचा हा सारा फीडबँक देव आणि धर्मविषयक कल्पनेसोबत बिंबवला जातो.माणसाने नीतीवान असावे,चोरी करु नये,वडिलांचा आदर करावा,आईवर प्रेम करावे, दुस-याशी चांगले वागावे या सगळ्यांशीच देव व धर्म अविभाज्यपणे रुजलेला असतो.माणसाच्या अंतर्मनाच्या जवळपास ८० ते ९० टक्के भागाशी या कल्पनांचा घनिष्ट संबंध असतो.अर्थात माणसांचा मेंदू जागृतपणे विचार करुन अंतर्मनात बदल घडवून आणू शकतो,पण त्यासाठी जागृत मनानं विचार करणं अत्यंत आवश्यक व सोयीचं आहे.

नव्या माणसासमोर ज्यावेळी आपण देव व धर्मावर हल्ला करतो,त्यावेळी जागृत मनानं विचार करुन ही गोष्ट स्वीकारायची की नाही हे ठरवण्याआधीच सुप्त मन वा अंतर्मन एकदम दरवाजाचं बंद करुन टाकतं.कारणं हा हल्ला त्यांच्या ८० ते ९० टक्के भागावरच झालाय असं त्याला वाटतं आणि ते स्वतःच्या भक्कम संरक्षणाची फळी उभे करतृं म्हणून माणसात खरंच बदल घडवून आणायचा असेल तर त्याचं अंतर्मन दुखावणार नाही अशा पध्दतीनेच,पायरी पायरीनं हा बदल घडवता आला पाहिजे.प्रत्यक्ष जागृत मनाला वैञानिक प्रत्येक गोष्ट स्वीकारण्याची सवय लावली पाहिजे. एकदा जागृत मनाला वैञानिक पध्दतीनं विचार करुन स्वतःत बदल घडविण्याची सवय लागली की तो स्वतःत आमुलाग्र बदल घडवून आणू शकतो.
म्हणून या सर्व प्रश्नांचा विचार करुन आपण धर्म व देवविषयक भूमिका निश्चित केला आहे.हीच खरी वैञानिक प्रक्रिया आहे.
भूताविषयीची अंधश्रध्दा हा भावनात्मक मुद्दा नसतो.धर्मश्रध्देचा भाग नसतो.म्हणून ज्यावेळी या अंधश्रध्देची योग्य कारणमीमांसा दिली जाते,त्यावेळी समोरची व्यक्ती ती समजावून घेऊ शकते.त्यावर विचार करुन पटल्यास ती जागृत मनाच्या पातळीवर स्वीकारते आणि मग ह्ळू हळू सुप्तमनावरचा हा भूताविषयीचा गैरसमज काढून टाकते.

या पध्दतीनं एक एक व्यक्ती गैरसमज सहजतेनं पण प्रयत्नपूर्वक दूर करु शकते.या प्रक्रियेत त्याच्या जागृत मनाला तर्कशुध्द विचार करण्याची सवयच लागते.प्रत्येक गोष्ट वैञानिक कसोटीवर तपासून स्वीकारण्याची सवय एकदा त्याच्या व्यक्तित्मत्वाचा अविभाज्य भाग बनली की धर्म व देव यासारख्या नाजूक मुद्द्याबाबत तो तीच चिकित्सक कसोटी वापरतो आणि या गोष्टी या कसोटीवर न टिकल्यास तो त्या सोडण्यास वा त्यात सुधारणा करण्यास तयारही होतो.अंधश्रध्दा निर्मुलनाचं खरं काम म्हणजे ही मेंदूची तर्कशुध्द विचार करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचं काम आहे.

एकदा का ही प्रक्रिया मानवी मेंदूत रुजली की त्यांत अंधश्रध्देला मुळीच थार नसतो.असेलच तर अञान राहील पण अंधश्रध्दा मात्र शोधूनही सापडणार नाही.