अंधश्रध्दा म्हणजे काय?


जी गोष्ट मुळात खरी नसतानाही तिच्यावर विश्वास ठवणे,ती मानणे म्हणजे अंधश्रध्दा ,अंधश्रध्दा केवळ अञान नाही तर ती प्रक्रिया आहे.म्हणूनच देवा-ध्रर्माशी तिचं नातं एवढं सरळ आणि सोपं नाही.महाराष्ट्रात खरं म्हणजे हा मुद्दा समर्थपणे तपासून पाहण्याइतपत एक मोठया प्रमाणावर खात्रीलायक प्रयोग झाला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देव व धर्म नाकाणारा बुध्द धर्म स्वीकारला त्यांच्या चळवळीतील बहुसंख्य समाज गेल्या ४० वर्षाच्या प्रयत्नांना खरंच देव मानत नाहीत.बहूसंख्यांक(हिंदु) धर्मही मानत नाहीत. म्हणून त्यांच्यातल्या अंधश्रध्दा दूर झाल्यात का? दीक्षाभूमीवर जाणा-या जनतेपैकी किमान एक-चतुर्थांश लोक तरी विक्तुबाबासारख्या एका पागल माणसाच्या देवस्थानाला वा गजानन महाराजांच्या शेगावला मोठया भक्तीभावाने भेटी देतात,भूत-प्रेत मानतात,म्हणजे देव सुटला तरी बाकीच्या अंधश्र्ध्दा बहुसंख्यं लोकांना तशाच गोचिडीसारख्या चिटकवून राहिल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे.म्हणूनच देव व धर्म नाकारणारेही अंधश्रध्दा असू शकतात.त्याचं कारण एवढंच आहे की अंधश्रध्दा असू शकतात.त्याचं कारण एवढंच आहे की अंधश्रध्दांचं मूळ देव व धर्म या कल्पनेतं नाही,तर अंधश्रध्दाच्या प्रक्रियेत आहे. ज्याला आपण श्रध्देची वा शब्दप्रामाण्याची प्रक्रीया म्हणतो ती ही प्रक्रिया.

अमूक-अमूक सांगतो,म्हणून ते खरंच असलं पाहिजे.तो महान माणूस म्हणतो तो शब्दंच प्रमाण,वेगळ्या प्रमाणाची आवश्कताच नाही.चिकित्सा करण्याची गरज नाही शब्दप्रांमाण्य आणि अचिकित्सा हे अंधश्रध्दा प्रक्रीयेचे दोन प्रधान घटक आहेत.

हीच गोष्ट आंबेडकरवादी चळवळीतील बहुसंख्य सामान्य जनतेची झाली.डॉ.बाबासाहेब सांगतात म्हणून त्यांच्या शब्दाखातर त्यांनी देव व धर्म सोडला.पण या देवधर्म सोडण्यामागे जी एक संपूर्ण वैञानिक विचार करण्याची प्रक्रिया होती,ती कधी त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही.त्या काळात डॉ.आंबेडकरांना वेळ कमी मिळाला आणि नंतरचे त्यांचे अनुयायी त्यांच्या नावावर राजकारणच करीत राहिले.आंबेडकरांनी सुरु केलेली प्रबोधनाची चळवळ खुंट्ली.सर्वसामान्य जनतेमध्ये वैचारिक प्रक्रिया निर्माण होऊ शकली नाही.पर्यायाने देव व धर्म जाऊनही अंधश्रध्दा तशाच कायम राहिल्या फक्त पंडीतांच,धर्ममार्तंडांच व ब्राह्मणांच शब्दप्रामाण्य जाऊन त्याठिकाणी आंबेडरांचं शब्दप्रामाण्य आलं.

अर्थात चांगल्या व्यक्तीचं,विचारांचं शब्दप्रामाण्य स्वीकारलं तर तेवढा त्या समाजाचा फायदा होतोच तोच फायदा आंबेडकरांच्या विचार क्षमतेमुळे त्या समाजाचा झाला.पण शब्दप्रामाण्य शेवटी मानवी बुध्दीच्या विकासाचा शत्रूच असतो.
मला वाटतं आपल्या लक्षात आलं असेल की अंधश्रध्देविरुध्द आपली लढाई आपली लढाई आहे याचा अर्थ आपली खरी लढाई शब्दप्रामाण्यविरुध्द आहे.चिकीत्सा न करण्याच्या प्रवृत्तीविरुध्द आहे.

जो समाज शब्दप्रामाण्य स्वीकारत नाही,ज्या समाजात खुली चिकीत्साप्रवृत्ती विकसित झाली आहे.त्या समाजात दिर्घकाळ अंधश्रध्दा राहणं शक्यच नाही जसं जस ञान वाढत जातं,तशीतशी या अंधश्रध्दा कमी होत जातात.खरं सांगायचं तर अशा समाजात केवळ अञानाच शिल्लक राहतं आणि अञान तर नेहमीच शिल्लक राहणार आहे.जसं जस ञान वाढत जातं तसतशी अञानाची जाणीवही वाढत जाते आणि इथेच पठडीतील पुरोगामी विचार करणा-यांची गल्लत होते.
संपूर्ण मानवजातीच्या इतिहासांच अवलोकन केलं असता आपणासं आढळत की अंधश्रध्दामधुनच आजचं आधुनिक विञान विकसित झालं आहे.

अंधश्रध्दा म्हणजे तरी काय असतं?त्या कशा निर्माण होतात?परिसरात एखादी घटना घडते?ती घटना का घडते याचं कारण शोधण्याचा माणूस प्रयत्न करतो.अर्थात त्या काळात जेवढं ञान उपलब्ध असेल,त्याच्या आधारावर तो ती कारणमीमांसा शोधतो,अनेकदा ही कारणमीमांसा अपु-या ञानामुळे पूर्णतः चुकीची असते.
अशी चुकीची कारणमीमांसा म्हणजेच अंधश्रध्दा,उदाहरणार्थ माणसांच्या अंगात येत हे खरं आहे.फक्त भूत येत ही त्याची कारणमीमांसा अंधश्रध्दा आहे.खोटी आहे.

सर्वसामान्य स्थितीत ही चूकीची कारणमीमांसा समाजात रुढ झाली तरी अधिक योग्य,अचूक वैञानिक कारणमीमांसा मिळाल्यानंतर ती गळून पडते.अंधश्रध्दा दूर होतात विञानाचा विकास होतो.सगळ्या संस्कृतीमध्ये याच पध्दतीने हे घडत आलं आहे.
पण अडीच ह्जार वर्षापूर्वी धर्माचा उदय झाला.त्यासोबत शब्दप्रमाण्य प्रतिष्ठित झालं.नव्हे ते अंतीम प्रमाण(देववाक्य)ठरलं.परिणमतः ञान वाढलं,अचूक कारणमीमांसा मिळाली तरी बदलाला स्थान उरलं नाही.उलट बदलणे हा अधर्मच ठरला आणिअंधश्रध्दा दृढमूल झाल्या.

धर्मानं शब्दप्रामाण्य रुजवलं म्हणून अंधश्रध्दा दीर्घकाळ टिकल्या हे खरं आहे.यामुळेच अनेकांना धर्म हे अंधश्रध्दांचे मूळ वाटतं.पण हे चुकीचं आहे.हे आपण समजून घेतलं पाहिजे.आपला खरा विरोध हा शब्दप्रामाण्याला असतो.धर्माला नव्हे.
कारण धर्म केवळ शब्दप्रामाण्य नव्हे.काही वर्षापूर्वी शब्दप्रामाण्य आणि धर्म यांची फारकत करता येत नसे.पण १७ व्या शतकापासून धर्म विरुध्द विञान झगडा सूरु झाला आणि या झगडयात विञानाची सातत्यानं सरशी होत गेली.संपूर्ण धर्माचा डोलारा कोसळवणा-या डार्विनचा उत्क्रांतीवादही जेव्हा धर्मानं पचवला.तेव्हाच धर्म आणि शब्दप्रामाण्य याची फारकत व्हायला सुरुवात झाली आजवर मोठया प्रमाणवर ही फारकत झाली आहे.अगदी भारतासारख्या मागासल्या देशातही ही फारकत सर्वसामान्य झालं आहे.

धर्मात सांगितलेला प्रत्येक शब्द खराच असतो वा आहे असा दुराग्रह आज कोणताही सामान्य माणूस ठेवत नाही.म्हणूनच शब्दप्रामाण्याविरुध्दची आपली ही लढाई ठेरतेच असं नाही.
ही संपूर्ण विचारधारा नीट समजावून घेण्यासाठी वाचकांनी "धर्म आणि विञान" हे बर्टान्ड रसेलचं पुस्तक नीट वाचायला हवं धर्माचे प्रमुख तीन घटक आहेत.धर्मसूत्रं(धार्मिक तत्वञान) चर्च(पुरोहितशाही) आणि नैतिक मूल्य(केवळ योनिशुचिता नव्हे) कोणत्याही समाजात अपरिहार्य आहेत.नीतीशिवाय समाज जिवंतच राहू शकत नाही आणि धर्माने त्या-त्या काळी ही नीतीमूल्ये प्रभावीपणे रुजविली,हा धर्माचा सर्वात मोठा कार्यभाग आहे.धर्म आणि नीतीमूल्ये रुजविण्यासाठी धार्मिक तत्वञानाची बैठक घ्यावी लागली.पुरोहितशाहीने ती राबवली त्यामुळे पुरोहितशाहीला प्रतिष्ठा प्राप्त झाली.
आज आपलं म्हणणं काय असतं?नीतीमूल्ये आवश्यक आहेत.आणि ती समाजात हवीच आहेत.मतभेद असतो तो फक्त तपशिलांबाबतचा दुसरा आपला विरोध धार्मिक तत्वञानाला नसतो तर,त्यातल्या अवैञानिक भागाला असतो.कदाचित संपूर्ण तत्वञान अवैञानिक ठरत असेल तरी आपला विरोध ते धार्मिक आहे म्हणून नसतो तर ,अवैञानिक, असत्य आहे म्हणून असतो.

आपण पुरोहितशाहीच्या विरोधात आहोत.आजच्या काळात अशा माध्यमांची गरज नाही असं आपण मानतो.आणि समाजात नीतीमूल्ये राबवणा-या कायदेव्यवस्था,न्यायालय,राज्य,कुटूंब,समाज इत्यादी विकसित संस्था रुजल्या असल्यामुळे पुरोहिशाहीच्या माध्यमातून आज नीतीमूल्ये राबविण्याची मुळीच गरज नाही असं वाटत.धर्मातील तीन प्रमुख प्रकारांमध्ये पुरोहितशाही नको,तत्वञान सुधारुन घ्यावं,आधुनिक काळाला साजेशी नीतीमूल्ये असावीत या मतापर्यत आपण येऊन पोहोचल आहोत.

हा समाज,धर्माला विरोध म्हणजे नीतीमूल्यांना विरोध समजतो.अशा अवस्थेत मुळात धर्माच्या विरोधात नसताना,उगाच धर्मविरोधी भुमिका घेऊन नीतीमूल्ये विरोधी आहोत अशी स्वतःची प्रतिमा निर्माण करुन आपल्या कार्याची हानीच आपण करुन घेत नाही काय? त्यामुळे धर्मविरोधी भूमिका घेणे हे मुळातच कसं अशास्त्रीय ठरतं,ते आपण पाहिलं आहे.तीच गोष्ट देवविषयक श्रध्देची. देव आहे की नाही या वादात न पडता,देव या कल्पनेचा निर्मिती कशी झाली ते आपण पाहुया.
मानववंशशास्त्राचा अभ्यास आपणांस सांगतो की,निसर्गाविषयीच्या अञानातून माणसांन देवाची कल्पना निर्माण केलं की नाही याविषयी वाद होऊ शकेल.पण माणसाने देव निर्माण केला हे एक निर्विवाद सत्य आहे.

देवाची कल्पना केवळ अञानापोटी निर्माण झाली नाही,तर ती एक मूलभूत अशी मानसिक गरजही होती.माणुस जन्मताच आईच्या नाळेपासून तोडला जातो.त्याला एकटं असुरक्षित वाटायला लागतं.म्हणून तो प्रथम आईला व नंतर मानवी समाजाच्या प्रगल्भ अवस्थेत सर्वशक्तीमान देवाशी वा ईश्वराशी स्वतःला जोडून घेतो.स्वतःची नाळ कधीही न तुटणा-या चिरंतन,सर्वव्यापी अशा ईश्वराशी त्यानं जोडली.म्हणूनच ईश्वराची कल्पना सर्वदूर व सर्वच समाजात प्रस्थापित झाली.
आजच्या काळात इतिहासात कधीही नव्ह्ती एवढी अधिक सुरक्षित समाजव्यवस्था निर्माण झाली आहे,